NEET पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन
NEET पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे यांचे मौन आंदोलन
अहिल्यानगर
NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर येथे मौन आंदोलन सुरू केले आहे.
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अण्णा हजारे यांनी हे आंदोलन हाती घेतले. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.
मौन आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविषयी त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली असून, संपूर्ण प्रकरणात पारदर्शक चौकशी होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.