NEET 2026 पेपर लीकचा संशय; WhatsApp वर प्रश्न विक्रीचा आरोप

0
28
नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा २१ जून रोजी; पेपरफुटीनंतर NTA चा निर्णय
नीट यूजी २०२६ फेरपरीक्षा २१ जून रोजी; पेपरफुटीनंतर NTA चा निर्णय

NEET 2026 पेपर लीकचा संशय; WhatsApp वर प्रश्न विक्रीचा आरोप

देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परीक्षेचे अनेक प्रश्न तब्बल ४२ तास आधीपासून WhatsApp वर विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.

NEET परीक्षेसाठी दरवर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थी वर्षभर कठोर मेहनत घेत असतात. अशा परिस्थितीत पेपर लीकच्या आरोपामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सॅम्पल पेपर’मधील सुमारे ४१० पैकी १२० प्रश्न प्रत्यक्ष Chemistry आणि Biology विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर NEET संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केरळपासून राजस्थानमधील सीकरपर्यंत पेपर लीकच्या संभाव्य साखळीचा तपास सुरू केला आहे.

पेपर लीकची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नसल्याचेही समोर आले आहे. मागील दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांचे तब्बल ८९ वेळा पेपर लीक झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या असून, त्यापैकी ४८ वेळा परीक्षा पुन्हा घेण्यात आल्या होत्या.

दरम्यान, National Testing Agency अंतर्गत घेण्यात आलेल्या NEET (UG) 2026 परीक्षेशी संबंधित कथित अनियमिततेप्रकरणी राजस्थान अतिरिक्त डीजीपी (एसओजी) विशाल बन्सल यांनी तपास सुरू केला आहे. NTA कडून तपास यंत्रणांना आवश्यक तांत्रिक सहाय्य आणि परीक्षा संबंधित माहिती पुरवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here