अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुका व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संघटन बळकटी, आगामी निवडणूक नियोजन आणि प्रभावी रणनीती यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आलेला हा मेळावा प्रचंड उत्साह, शिस्त व एकजुटीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, महिला अध्यक्षा आरती साळवी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी तसेच जिल्हाध्यक्ष वेंकटेश मानव यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संघटन अधिक मजबूत करण्यावर, बूथस्तरावरील कामकाज, मतदारांशी थेट संवाद आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा मेळावा यशस्वी ठरला असून, आगामी राजकीय घडामोडींसाठी संघटना सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.


