अतितीव्र दिव्यांगांसाठी ‘निर्वाह भत्ता योजना’
प्रस्ताव सादरीकरणाची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025
रायगड : जिल्हा परिषद रायगडच्या अर्थसंकल्पात 2025-26 या वर्षासाठी अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी ‘निर्वाह भत्ता योजना’ समाविष्ट करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र दिव्यांगांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (IAS) यांनी केले आहे.
योजनेसाठी तयार केलेले विहित नमुन्याचे अर्ज पंचायत समिती कार्यालये तसेच सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध आहेत. निवड निकष, अटी-शर्ती व आवश्यक कागदपत्रेही निश्चित करण्यात आली आहेत.
योजनेचे प्रमुख निकष :
• दिव्यांगत्व 60% किंवा त्याहून अधिक, जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अनिवार्य
• फक्त UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र ग्राह्य
• लाभार्थी ग्रामीण भागातील व रायगड जिल्ह्याचा रहिवासी
• वय : 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त
• उत्पन्न मर्यादा : 1 लाखांच्या आत / बीपीएल असल्यास ग्रामसेवक-गटविकास अधिकारी यांचा संयुक्त दाखला
• शासकीय/निमशासकीय पेन्शनधारक पात्र नाहीत
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, रेशनकार्ड/रहिवासी दाखला/विद्युत बिल (पैकी 1), बँक पासबुक झेरॉक्स, UDID कार्ड झेरॉक्स इत्यादी.
जिल्ह्यातील अतितीव्र दिव्यांग व्यक्तींनी निर्धारित मुदतीत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Form Down Load Link:- https://divyangkalyan.rzpapps.in/Web/mandate


