“मंत्री उत्तर देतात, पण अंमलबजावणी नाही’ – आमदार शशिकांत शिंदे यांची सरकारवर टीका

0
49
“मंत्री उत्तर देतात, पण अंमलबजावणी नाही' - आमदार शशिकांत शिंदे यांची सरकारवर टीका
“मंत्री उत्तर देतात, पण अंमलबजावणी नाही' - आमदार शशिकांत शिंदे यांची सरकारवर टीका

“मंत्री उत्तर देतात, पण अंमलबजावणी नाही’ – आमदार शशिकांत शिंदे यांची सरकारवर टीका

मुंबई l नवी मुंबई l प्रतिनिधी

सिडकोच्या (CIDCO) घरांच्या किमती कमी करण्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असून, काही वेळा आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सिडकोच्या सामान्य लोकांना घर मिळावे ही मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे की, मंत्री उत्तर देतात, पण वचनाची पूर्तता होत नाही.

आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत दाखल केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, जर सिडकोच्या घरांचे दर कमी करायचे असतील तर लगेच बैठक बोलावणे गरजेचे आहे. “मंत्री उत्तर देतात, मात्र काहीही होत नाही” अशी आमची मागणी असून, “राज्य सरकारने दोन दिवसांत बैठक बोलावून निर्णय घ्यावा”, असा त्यांनी आग्रह केला. हे विधान त्यांनी त्या पारंपरिक पद्धतीवर टीका करत म्हटले आहे , ज्यामध्ये प्रश्नांची उत्तर देणारा कायमचा मंत्री नसतो आणि त्याऐवजी एखादा ‘प्रभारी मंत्री’ नियुक्त केलेला असतो.

शशिकांत शिंदे यांचा असा दावा आहे की, ही प्रथा चुकीची असून “प्रभारी मंत्री” नेहमीच प्रश्नाला उत्तर देण्यास “कॅपेबल” असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे म्हणाले की “जर उत्तर द्यायचेच असेल तर, खऱ्या पदावर असणाऱ्या मंत्र्यांनीच  उत्तर द्यावे, अन्यथा, हे नियम बदलावेत .” तसेच त्यांनी सदनाच्या सभापतींनी यावर रुलिंग करा. नागरिकांसाठी स्वत:च्या घरांचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी शासनाने कायम स्वरुपी निर्णय घ्यावा, अशा मागणीचा आग्रह केला.

त्याचबरोबर  सिडकोने दर कमी करण्याबाबत विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल का ? अशीही आशा व्यक्त केली. गेल्या महिन्यांत, सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या दरांवरून उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावली गेली होती. त्यावेळी काही प्रमाणात दर कमी होण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु त्या बैठकींना बारकाईने पाहिल्यास सातत्य नव्हते. अनेक वेळा त्या पुढे ढकलल्या गेल्या. आता, सिडकोच्या घरे घेणाऱ्या लोकांच्या परिस्थितीवर लक्ष देणे आवश्यक आहे.

बऱ्याच लोकांनी जास्त किमतींच्या घरांना नकार दिला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारवरचा  विश्वास कमी झाला आहे असेदिसून येत आहे. . सरकारने सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, तसेच ज्यांनी याआधी वचन दिले होते त्यांनी ते वचन पाळावे असे स्पष्ट शब्दात शशिकांत शिंदे यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here