अभिनय सम्राट मोहन जोशी यांचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ ने सन्मान

0
10

कोल्हापूर :
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या कसदार अभिनयाने समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित सोहळ्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अभिनय सम्राट मोहन जोशी यांचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ ने सन्मान
अभिनय सम्राट मोहन जोशी यांचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ ने सन्मान
रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत विविधांगी भूमिका साकारत मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासातून त्यांनी मराठी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या कलाप्रवासाचा गौरव करण्यात आला.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला समृद्ध करणाऱ्या मोहन जोशी यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा सन्मान हा निश्चितच अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या आजवरच्या कलाप्रवासाला मनःपूर्वक सलाम करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here