अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा लाभ

0
7
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा लाभ
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा लाभ

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४,७६४ कोटींचा लाभ

 आतापर्यंत १८,०४० कोटी रुपये वितरित

मुंबई :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील ४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना ४ हजार ७६४ कोटी रुपयांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रकमेचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २० लाख ७२ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण १८ हजार ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या ३१ लाख १७ हजार थकीत कर्जखात्यांच्या माहितीच्या आधारे २५ लाख ८२ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here