आंबेनळी घाट दुर्घटना : स्कॉर्पिओ दरीत कोसळून ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू; २० तासांचे बचावकार्य

0
22

पोलादपूर | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटात रविवारी (२४ मे २०२६) पहाटे भीषण अपघात घडला. स्कॉर्पिओ वाहन खोल दरीत कोसळल्याने वाहनातील सर्व ८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळ अत्यंत दुर्गम आणि खोल दरीत असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पोलादपूर पोलीस, विविध रेस्क्यू पथके आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे अथक प्रयत्न करत तब्बल २० तास विशेष बचाव मोहीम राबविली.
दीर्घ आणि आव्हानात्मक बचावकार्यानंतर सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे हलविण्यात आले असून ओळख पटविण्याची आणि इतर आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर पोलादपूर पोलीस ठाण्याकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. घाटातील धोकादायक वळणे आणि रस्त्यांची परिस्थिती याबाबतही चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातामुळे आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी घाटमार्गावर अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here