सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव; राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

0
48
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ नाव

राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे करण्यास मान्यता दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या २६ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजवादी विचारवंत, ज्येष्ठ संसदपटू, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि कोकणातील सुपुत्र लोकमान्य मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे नामकरण करण्यात येत आहे.
मधु दंडवते यांनी भारतीय रेल्वेच्या विकासात तसेच सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, आता पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाचे अधिकृत नामकरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here