आरोग्य विभागातील १० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन

0
18
आरोग्य विभागातील १० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन
आरोग्य विभागातील १० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन

आरोग्य विभागातील १० वर्षांहून अधिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन

सिंधुदुर्गातील २३० कर्मचाऱ्यांना दिलासा – नितेश राणे

सिंधुदुर्ग, दि. २७ :
राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदांवर एकवेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २३० कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग यांच्या पदाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या सेवेला स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होईल.
तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागात सुमारे २३० कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, रश्मी सोहनी, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सागर चव्हाण, अंकिता तेली, दीपक रहाटे, आदिती चव्हाण, प्रसाद यादव, शारदा तावडे आणि नेहा अनवकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here