रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (८७ वे वर्ष) वतीने आयोजित ‘लाडका लंबोदर’ गणेशोत्सवाच्या मातीपूजन सोहळ्याचे आयोजन आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर काळाचौकी, मुंबई येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
या शुभप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली आणि आगामी गणेशोत्सव निर्विघ्न, उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडावा, अशी प्रार्थना केली. मातीपूजनाच्या धार्मिक विधींनी गणेशोत्सवाच्या तयारीला शुभारंभ झाला.
यंदा मंडळ आपल्या ८७ व्या वर्षात पदार्पण करत असून, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपत आकर्षक देखावे, विविध जनजागृती उपक्रम आणि भक्तांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.