
आषाढी वारीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मोफत भोजन व चहा-नाश्त्याची व्यवस्था
मुंबई, दि. २५ :
आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या स्वखर्चातून मोफत भोजन व चहा-नाश्त्याची व्यवस्था केली आहे.

२४ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारीच्या काळात वाढलेल्या प्रवासी सेवेमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.


