महाराष्ट्रात मतदार गणना अर्जांच्या वितरण व डिजिटायझेशनला वेग
महाराष्ट्रात मतदार गणना अर्जांच्या वितरण व डिजिटायझेशनला वेग
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली २५ जुलैची स्थिती
मुंबई, दि. २५ :
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात मतदारनिहाय गणना अर्ज (Enumeration Forms – EFs) यांच्या वितरण आणि डिजिटायझेशनचे काम वेगाने सुरू असून, २५ जुलै २०२६ पर्यंतची अद्ययावत स्थिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून मतदारांना गणना अर्जांचे वितरण केले जात असून, भरून आलेल्या अर्जांचे डिजिटायझेशनही युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेद्वारे मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याचा उद्देश आहे.
निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांना अद्याप गणना अर्ज मिळाले नसतील किंवा त्यांनी अर्ज भरले नसतील, त्यांनी आपल्या संबंधित बीएलओ अथवा विशेष एसआयआर कॅम्प येथे संपर्क साधून अर्ज भरावेत. तसेच, भरलेले अर्ज वेळेत जमा करून मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि बीएलओ समन्वयाने कार्यरत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.