घाटकोपर प्रगती मंचाच्या आषाढी एकादशी उत्सवाला महापौर ऋतु तावडे यांची सदिच्छा भेट

0
18

मुंबई, दि. २५ :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ‘घाटकोपर प्रगती मंच’ आयोजित मुंबईतील सर्वात मोठ्या आषाढी एकादशी उत्सवाच्या दशकपूर्ती सोहळ्याला मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी सदिच्छा भेट देत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि विधिवत राजोपचार पूजा केली.

यावेळी महापौर ऋतु तावडे यांनी उपस्थित विठ्ठलभक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत, “राम कृष्ण हरी… माउली… माझिया घाटकोपर नगरी, साजिरी पंढरीची वारी!” अशा शब्दांत भक्तिभाव व्यक्त केला.

दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी उपवासाची खिचडी, केळी आणि तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच, मूर्तिकार रोहित जिजोते यांच्या कलाकृती, रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या आकर्षक रांगोळ्या आणि रमेश हडपी यांच्या सुरेल विठ्ठल भजनांनी संपूर्ण घाटकोपर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
महापौर ऋतु तावडे यांनी या भव्य आणि भक्तिमय आयोजनाबद्दल ‘घाटकोपर प्रगती मंच’च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत, अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा व अध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here