आषाढी वारीपूर्वी नूतन पालखी रथाचे विधिवत पूजन

0
22
आषाढी वारीपूर्वी नूतन पालखी रथाचे विधिवत पूजन; संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्जता पूर्ण
आषाढी वारीपूर्वी नूतन पालखी रथाचे विधिवत पूजन; संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्जता पूर्ण

आषाढी वारीपूर्वी नूतन पालखी रथाचे विधिवत पूजन

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्जता पूर्ण

आळंदी प्रतिनिधी
आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या नूतन पालखी रथाचे विधिवत पूजन आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या वतीने वैदिक मंत्रोच्चारात आणि पारंपरिक धार्मिक विधीनुसार रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे पदाधिकारी, मान्यवर, वारकरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या नव्या रथातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या निमित्ताने रथाला आकर्षक सजावट करण्यात आली असून, वारकरी परंपरेचा गौरव जपत भक्तांच्या सेवेसाठी तो सज्ज करण्यात आला आहे.
पूजन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी नूतन पालखी रथाचे दर्शन घेत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. संपूर्ण परिसरात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here