उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्जाची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत

0
45

मुंबई : ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहेत.

याबाबतची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here