टेंभीनाका दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

0
32
टेंभीनाका दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी
टेंभीनाका दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

टेंभीनाका दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाणे : ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थित गोविंदांशी संवाद साधत उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

टेंभीनाक्याची दहीहंडी ही केवळ एक स्पर्धा नसून वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेल्या परंपरेची आणि ठाण्याच्या सांस्कृतिक ओळखीची मानाची खूण आहे. या दहीहंडीला सलामी देऊन गोविंदा पुढील दहीहंड्यांकडे जातात. त्यामुळे ठाण्यातील या उत्सवाला विशेष महत्त्व असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गोविंदा उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी शासनाने या पारंपरिक खेळाला संस्थात्मक पाठबळ दिले आहे. गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा, सार्वजनिक सुट्टी तसेच गोविंदांचा विमा अशा माध्यमातून शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच **‘प्रो गोविंदा’**च्या माध्यमातून गोविंदाला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी दहीहंडीसाठी खास उपस्थित असलेले अभिनेता गोविंदा, अभिनेता सिद्धार्थ जाधव, दत्तू मोरे यांच्यासह इतर कलावंतांचा सन्मान करण्यात आला. तसेच टेंभीनाक्यावर थर रचणाऱ्या विविध गोविंदा पथकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, उबाठा गटाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here