दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटकांचे सुखरूप रेस्क्यू

0
29
दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटकांचे सुखरूप रेस्क्यू
दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटकांचे सुखरूप रेस्क्यू

दिवेआगर समुद्रकिनारी तीन पर्यटकांचे सुखरूप रेस्क्यू

दिवेआगर :
पर्यटनासाठी दिवेआगर येथे आलेले तीन पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील विसर्जन पॉईंट येथे पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. मात्र, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही समुद्राच्या पाण्यात बुडू लागले.
यावेळी पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याचा आवाज ऐकून पोर्ट केबिन येथे कर्तव्यावर असलेले होमगार्ड रेवाळे तसेच दिवेआगर येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जेस्कीच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत तिन्ही पर्यटकांना सुरक्षितपणे समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
सुदैवाने तिन्ही पर्यटकांची प्रकृती स्थिर असून, अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि होमगार्ड यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

समुद्रकिनारी पर्यटकांना सुरक्षिततेचे आवाहन

समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य द्यावे. पाण्याचा अंदाज नसताना अथवा धोकादायक ठिकाणी समुद्रात पोहणे टाळावे. प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या सूचनांचे पालन करूनच समुद्राचा आनंद घ्यावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here