पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंगचे प्रमुख केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध :उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंगचे प्रमुख केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध :उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
85
पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंगचे प्रमुख केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध : सुनेत्रा पवार
पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंगचे प्रमुख केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध : सुनेत्रा पवार

पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंगचे प्रमुख केंद्र बनविण्यास शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : पुण्यात भेट देणाऱ्या UCI (Union Cycliste Internationale) च्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ आयोजित गाला डिनरला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून शिष्टमंडळाचे मनःपूर्वक स्वागत केले. पुण्याला आंतरराष्ट्रीय सायकलिंग आणि क्रीडा पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला UCI तसेच Cycling Federation of India (CFI) चे प्रतिनिधी, पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्राच्या क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Pune Grand Tourच्या यशस्वी आयोजनासह पुण्याच्या UCI Road World Championshipsच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र शासनाचे पूर्ण सहकार्य आणि ठाम पाठबळ राहील, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
पुण्यातील स्पर्धेच्या आयोजनासाठी करण्यात आलेली उत्तम तयारी, प्रशासनातील विविध विभागांमधील समन्वय आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल UCI शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. शिष्टमंडळाकडून मिळालेली ही सकारात्मक प्रतिक्रिया पुण्यासाठी निश्चितच आनंददायी आणि उत्साहवर्धक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धांचे आयोजन, क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास आणि क्रीडा पर्यटनाला चालना देण्याच्या माध्यमातून पुण्याची जागतिक क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here