ठाणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव

0
28
ठाणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव
ठाणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव

ठाणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा आदर्श अधिकारी म्हणून गौरव

ठाणे : ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘जिल्हा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ग्रामीण विकासासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक आणि सन्मान पदक देऊन गौरव करण्यात आला.

ग्रामपंचायत अधिकारी हे प्रशासन आणि ग्रामस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची या कार्यक्रमात विशेष दखल घेण्यात आली.
या सोहळ्याला भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किसन कथोरे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान – ग्रामीण, जिल्हा ठाणे’ या पुस्तिका व घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार आणि आजीविका हमीशी संबंधित विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पंडित राठोड, उज्वला सपकाळे, दीपली घोरपडे, प्राची साळसकर, सुवर्णा माळी यांच्यासह ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सक्षम ग्रामपंचायत – विकसित गाव – समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र’ या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन्मान व प्रोत्साहन देणे हे निश्चितच स्तुत्य पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गौरविण्यात आलेल्या सर्व आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here