कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली येथे स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम उत्साहात

0
9
येथे स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत
येथे स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोली येथे स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम उत्साहात

दापोली, दि. १२ :
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छता पंधरवडा अभियान” अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोलीच्या कॅम्पस परिसरात स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या उपक्रमाचे नेतृत्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. के. जैन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रभारी अधिकारी डॉ. एच. एन. भांगे आणि डॉ. एम. एच. थारकर यांनी केले.

या अभियानात महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच बी. टेक., एम. टेक. आणि पीएच.डी.चे विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सर्व सहभागी सदस्यांनी एकत्रितपणे महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
यावेळी “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” आणि “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देत स्वच्छ व निरोगी पर्यावरणासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here