पशुधनाच्या विविध आजारांवरील जनजागृती कार्यक्रम; शेतकऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा – मधुकरशेठ पाटील

0
8
पशुधनाच्या विविध आजारांवरील जनजागृती कार्यक्रम; शेतकऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा – मधुकरशेठ पाटील
पशुधनाच्या विविध आजारांवरील जनजागृती कार्यक्रम; शेतकऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा – मधुकरशेठ पाटील

पशुधनाच्या विविध आजारांवरील जनजागृती कार्यक्रम; शेतकऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा – मधुकरशेठ पाटील

रोहा, दि. ११ ऑगस्ट :
केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ्य व पशुरोग नियंत्रण योजनेअंतर्गत पंचायत समिती रोहा येथील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयामार्फत पशुधनाच्या विविध आजारांवरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोहा तालुक्यातील अशोकनगर येथे प्रगतशील शेतकरी श्री. पाभरीकर यांच्या पशुधन प्रक्षेत्रावर करण्यात आले.

रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. मधुकरशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या मा. निधी जाधव, पंचायत समिती रोहा उपसभापती मा. संजयजी मांडलुसकर, सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अनिल परंडवाल, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी, विषय विशेषज्ञ डॉ. मांडवकर, प्रगतशील शेतकरी श्री. पाभरीकर तसेच विविध भागांतील पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मा. मधुकरशेठ पाटील यांनी पशुपालक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद सदस्या मा. निधी जाधव यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे सांगून लसीकरण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. उपसभापती मा. संजयजी मांडलुसकर यांनी शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी, असे मत व्यक्त केले.
डॉ. अनिल परंडवाल यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना व लसीकरण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून पशुधन निरोगी ठेवण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मनोज तलाठी यांनी एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचे महत्त्व, कृषि विज्ञान केंद्राचे कार्य तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध ॲप्सची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने मा. मधुकरशेठ पाटील, मा. निधी जाधव आणि मा. संजयजी मांडलुसकर यांना विद्यापीठ दैनंदिनीचे वाटप करण्यात आले. डॉ. मांडवकर यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती दिली.
या जनजागृती कार्यक्रमाला पंचक्रोशीतील एकूण ५७ शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here