सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक विवेकानंद दास यांचे निधन

0
8

१३ ऑगस्ट रोजी शोकसभा

मुंबई, दि. १२ :
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमळ शिक्षक म्हणून परिचित असलेले कै. श्री. विवेकानंद दास यांचे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी शांतपणे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कला क्षेत्रासाठी आणि त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी दुःखद धक्का मानली जात आहे.
श्री. दास यांनी आपल्या अध्यापन कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना कला शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांच्या साधेपणा, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि कलाक्षेत्रातील योगदानामुळे ते सर्वांच्या स्मरणात कायम राहतील.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई येथील मुख्य सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस माजी विद्यार्थी, सहकारी, कला क्षेत्रातील मान्यवर तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कै. विवेकानंद दास यांच्या निधनाने कला व शिक्षण क्षेत्रातील एक संवेदनशील आणि समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here