केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास कामांचा आज शुभारंभ

0
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास कामांचा आज शुभारंभ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास कामांचा आज शुभारंभ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास कामांचा आज शुभारंभ

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते शनिवारी (दि. २० जून) सकाळी होणार आहे. मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग तसेच परिवार देवता मंदिर संवर्धन प्रकल्पाच्या कामांचा प्रारंभ यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारमधील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखड्याअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. नव्या प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुरक्षितता आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच मंदिर परिसरातील परिवार देवता मंदिरांचे संवर्धन, जतन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), कोल्हापूर  वैद्यकीय शिक्षण मंत्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील (Chandrakant Patil), ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे (Vijaykumar Gavit), मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale), नगरविकास, परिवहन व सामाजिक न्याय राज्यमंत्री सह पालकमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal ) तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर  (Rajesh Kshirsagar )यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूरमध्ये राजकीय सभेचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर ते इचलकरंजी येथे सहकारी बँकेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच तेथेही एका राजकीय सभेला संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here