गुरुपौर्णिमेनिमित्त उदय सामंत यांनी घेतले श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग व संत जनार्दन स्वामी समाधीचे दर्शन

0
11

वेरूळ : गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय पर्वावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे भेट देत १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराचे तसेच श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी उदय सामंत यांनी श्री घृष्णेश्वर महादेवांचे विधिवत दर्शन घेऊन राज्याच्या प्रगतीसाठी तसेच जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत त्यांनी गुरूंच्या आशीर्वादाचे महत्त्व अधोरेखित केले.
यासंदर्भात उदय सामंत यांनी सामाजिक माध्यमांवर भावना व्यक्त करताना म्हटले की, “गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र आणि मंगल मुहूर्तावर श्री घृष्णेश्वर मंदिराचे आणि श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या पावन स्थळी दर्शनाने मिळालेला आशीर्वाद मनाला असीम शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देऊन गेला. श्री स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.”
गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण असून राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here