गोवा मेडिकल कॉलेजमध्ये २३ जागांसाठी भरती ; आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी 

0
224
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये २३ जागांसाठी भरती ; आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये २३ जागांसाठी भरती ; आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी पणजी I प्रतिनिधी

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये २३ जागांसाठी भरती ; आरोग्य क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी 

पणजी I प्रतिनिधी
गोवा मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथे विविध विभागांमध्ये तब्बल २३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बुधवारी ८ जानेवारी २०२६ रोजी गोवा मेडिकल कॉलेज येथील डीन कार्यालय सभागृहात सकाळी ९.३० वाजता मुलाखतीस सुरुवात होणार आहे. आरोग्य सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी आणि दिलासादायक संधी ठरणार आहे.
 या भरती अंतर्गत प्रस्तुतिशास्त्र, रेडिएशन, रेडिओलॉजी, सायकोलॉजी, नेत्ररोग, नर्सिंग, टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट तसेच सहाय्यक प्राध्यापक अशा विविध विभागांतील पदांचा समावेश आहे. काही पदे कंत्राटी पद्धतीने, तर काही थेट भरतीद्वारे भरली जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कागदपत्रांसह ठराविक दिवशी सकाळी ९.३० वाजता गोवा मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता कार्यालयात थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. संबंधित पदांनुसार पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले असून, काही पदांसाठी अनुभव अनिवार्य आहे.
या भरतीमुळे गोवा मेडिकल कॉलेजमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. स्थानिक तसेच गोव्यातील तरुण उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आशादायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here