छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात लाभ वाटप

0
4

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात लाभ वाटप

लँड टायटलिंग व गुंठेवारीबाबत महसूल मंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

कणकवली :
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत कणकवली तहसीलदार कार्यालयात महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभ वाटप व निवेदन स्वीकृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या शिबिरात विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच नागरिकांच्या विविध मागण्या, अडचणी आणि समस्यांबाबतची निवेदने स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यात लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर बांधण्यात आलेली घरे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद करताना, आवश्यक महसुली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल विभागाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सक्षम करून लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्याच्या उद्देशाने महसूल समाधान शिबिर अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार आमदार निलेशजी राणे, (Nilesh Rane), आमदार विक्रांत पाटील (Vikrant Patil),  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here