छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा
राजापूर : शासनाच्या वतीने ७ मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या नियोजन व पूर्वतयारीचा आढावा रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतला. राजापूर उपविभागातील लांजा आणि राजापूर तालुक्यांतील तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
या बैठकीत महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूलविषयक प्रलंबित तक्रारी, अर्ज आणि विविध प्रमाणपत्रे यांचे तत्काळ निवारण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


