जि.प.केंद्र शाळा चिंदर नं.१ येथे नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात

0
96
जि.प.केंद्र शाळा चिंदर नं.१ येथे नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात
जि.प.केंद्र शाळा चिंदर नं.१ येथे नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात

जि.प.केंद्र शाळा चिंदर नं.१ येथे नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात

” विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे”- रावजी तावडे

“आजचे विद्यार्थी खरच भाग्यवान असून शासनाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय दप्तर, वह्या, गणवेश, पुस्तके व गोड खाऊ वाटून तुमचे शाळेत स्वागत केले जात आहे. ही खूप आनंददायी बाब असून विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे.”असे भावपूर्ण उदगार सेवा निवृत्त शिक्षक रावजी तावडे यांनी पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा चिंदर नं.१ च्या नवागतांचे स्वागत कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना काढले. यावेळी आरोग्य सेवक -हवालदार संतोष सावंत यांनी हि विद्यार्थ्यांना आरोग्य, शिक्षक, शिक्षण या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त शिक्षक रावजी तावडे, हवालदार संतोष सावंत, चिंदर सेवा संघाचे विवेक परब, ग्रा.पं.सदस्य जान्हवी घाडी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ चिन्मयी पाताडे, वेदीका घाडी, मंजिरी केळकर, निलिमा घाडी, ब्राम्ही दत्तदास, भालचंद्र कावले, श्रीकांत कानविंदे, अर्जुन पवार, दिपक तावडे, मिलिंद चिंदरकर, समिर लब्दे, नंदिनी पावसकर, विनिता मसुरकर, निलिमा घाडी, सुनंदा अपराज, निर्मिती घाडी, अर्पिता पाडावे, अश्विनी पाताडे,
जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र प्रसाद गाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाळेच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने महिला शिक्षकांनी कुंकू तिलक लावून व पुष्पगुच्छ देऊन आणि आरती ओवाळून तसेच गोड खाऊ वाटून स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व विद्येची देवता श्री देवी सरस्वतीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय, गणवेश, वह्या,पुस्तके उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आली. इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्या सहा विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे सफेद कोऱ्या कागदावर उमठविण्यात आले. या पायाच्या ठशाची एक प्रत पालकांना देण्यात आली. तर एक प्रत शाळेकडे रेकॉर्डला ठेवण्यात आली.या सुंदर उपक्रमाचे पालकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
तसेच शाळेच्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन हवालदार संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी विधान परिषदे शिक्षक मतदार संघातील आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या निधीतून मिळालेला एक संगणक व चिंदर ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग निधीतून एक लॅपटॉप तसेच शाळेतील इतर संगणक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासत भर घालणार आहेत.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र प्रसाद गाड, शिक्षक नंदकुमार जुंधळे, सौ. वैशाली चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र प्रसाद गाड यांनी तर सूत्रसंचालन व आभार शिक्षक सचिन तवटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here