सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; रुग्णांचे हाल, नवीन यंत्राची मागणी

0
44
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; रुग्णांचे हाल, नवीन यंत्राची मागणी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; रुग्णांचे हाल, नवीन यंत्राची मागणी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील इंडोस्कोपी मशीन वारंवार नादुरुस्त; रुग्णांचे हाल, नवीन यंत्राची मागणी

जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

सावंतवाडी –
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोटाच्या आजारांचे निदान करणारी इंडोस्कोपी मशीन वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खाजगी रुग्णालयात इंडोस्कोपीसाठी ५ हजार रुपये मोजावे लागत असल्याने गोरगरीब रुग्णांचे कंबरडे मोडत आहे. हा गंभीर प्रकार जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या निदर्शनास रुग्णांच्या नातेवाईकांनी आणून दिला.
मसुरकर यांनी तत्काळ याची माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयाने जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील यांना लेखी पत्र देऊन मशीन दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मशीनच्या देखभाल-दुरुस्तीचा करार संबंधित कंपनीसोबत करणे बंधनकारक असते. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने हाच करार केलेला नसल्याने वारंवार मशीन बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मसुरकर यांना दिली.
“इंडोस्कोपीसाठी खाजगीत ५ हजार रुपये मोजावे लागतात. गोरगरीब रुग्ण हा खर्च करू शकत नाही. त्यामुळे निदान लांबणीवर पडून आजार बळावतो,” अशी व्यथा मसुरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडली.
मसुरकर यांच्या प्रमुख मागण्या:
1. निधीचा वापर करा: इंडोस्कोपी मशीन दुरुस्तीचा खर्च महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयाकडे जमा असलेल्या निधीतून करावा. जेणेकरून रुग्णांना खाजगीत जावे लागणार नाही.
2. नवीन मशीनची तरतूद: वेळोवेळी नादुरुस्त होणाऱ्या मशीनवर अवलंबून न राहता सावंतवाडी रुग्णालयाकडे कायमस्वरूपी अतिरिक्त इंडोस्कोपी मशीन असावी.
3. तातडीने प्रस्ताव द्या: नवीन इंडोस्कोपी मशीनसाठी सावंतवाडी रुग्णालयाने जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हा नियोजन समिती किंवा CSR निधीतून मागणी करावी आणि त्याबतचे लेखी पत्र तात्काळ पाठवावे.
“महात्मा फुले योजनेचा निधी रुग्णांच्या सेवेसाठीच आहे. तो दुरुस्तीसाठी वापरला तर सामान्य माणसाला दिलासा मिळेल. प्रशासनाने तातडीने AMC करार करावा आणि नवीन मशीनचा प्रस्ताव पाठवावा, अन्यथा गोरगरीब रुग्णांचे हाल थांबणार नाहीत,” असा इशारा राजू मसुरकर यांनी दिला आहे.
या प्रकारामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here