जुन्या लाकडी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर; बोट मालकांना अर्थसहाय्याची सुविधा – नितेश राणे

0
11

मुंबई : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि शाश्वत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने जुन्या लाकडी बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागाने हा उपक्रम हाती घेतला असून, या योजनेसाठी बोट मालकांना मुंबई बँकेमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक बोटींच्या वापरामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार असून, सागरी प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे. तसेच हरित आणि प्रदूषणमुक्त जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळणार असल्याने हा निर्णय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, या निर्णयाच्या समर्थनार्थ “नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन” संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात सदिच्छा भेट घेऊन शासनाचे आभार मानले. मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आणि मच्छीमारांच्या खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here