तळेगाव एमआयडीसीत ह्युंदाई मोटर इंडियाच्या प्लांटचे उद्घाटन; पुण्यात रोजगाराच्या नव्या संधींची अपेक्षा

0
6
तळेगाव एमआयडीसीत ह्युंदाई मोटर इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
तळेगाव एमआयडीसीत ह्युंदाई मोटर इंडियाच्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

तळेगाव एमआयडीसीत ह्युंदाई मोटर इंडियाच्या प्लांटचे उद्घाटन; पुण्यात रोजगाराच्या नव्या संधींची अपेक्षा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती; पुण्याच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना
पुणे :
पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी येथे ह्युंदाई मोटर इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती होती. पुण्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार
या प्रकल्पामुळे पुणे आणि परिसरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. वाहननिर्मिती क्षेत्राशी संबंधित पूरक उद्योग, स्थानिक सुटे भाग उत्पादक तसेच लघुउद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्राच्या वाहननिर्मिती क्षेत्राला चालना
शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात विशेष ओळख असलेले पुणे आता जागतिक दर्जाच्या वाहननिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र म्हणूनही विकसित होत आहे. ह्युंदाई मोटर इंडियाच्या या प्रकल्पामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील वाहननिर्मिती क्षेत्राच्या विस्ताराला आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यास ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष यूइसुन चुंग, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, भारतातील कोरिया प्रजासत्ताकाचे राजदूत ली सॉन्ग-हो यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here