महापौर रितू तावडे यांच्याकडून ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ अभियानाची स्वतःच्या प्रभागातून सुरुवात

0
14
महापौर रितू तावडे यांच्याकडून ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ अभियानाची स्वतःच्या प्रभागातून सुरुवात
महापौर रितू तावडे यांच्याकडून ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ अभियानाची स्वतःच्या प्रभागातून सुरुवात

महापौर रितू तावडे यांच्याकडून ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ अभियानाची स्वतःच्या प्रभागातून सुरुवात

घाटकोपर पूर्वेतील झुलेलाल चौक आणि गारोडिया नगर परिसरातील अनधिकृत बॅनर्स हटवले; ७२ तासांत तक्रारींचे निवारण करण्याची योजना

मुंबई :
मुंबईतील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटवून शहराचे सौंदर्य जपण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी जाहीर केलेल्या ‘शाडू बाप्पा दहा दिवस – फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस’ या अभियानाची सुरुवात १४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वतःच्या नगरसेवक प्रभागातून केली.

 

केवळ सूचना किंवा आवाहन न करता कोणत्याही मोहिमेची सुरुवात प्रत्यक्ष कृतीतून झाली पाहिजे, असा आपला विश्वास असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून घाटकोपर पूर्व येथील ‘एन’ विभागातील गजबजलेल्या झुलेलाल चौक (विक्रांत सर्कल) आणि गारोडिया नगर परिसरातील अनधिकृत फलक व बॅनर्स हटवले.
नवीन अनधिकृत फलकांवर कडक देखरेख
या परिसरात यापुढे नवीन अनधिकृत फलक लावले जाणार नाहीत, यासाठी कडक देखरेख ठेवण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे.
क्यूआर कोड प्रणालीसह कठोर उपाययोजना
अधिकृत फलकांची ओळख पटवण्यासाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली लागू करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुद्रक व एजन्सींना काळ्या यादीत टाकणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे ७२ तासांत निवारण करणे, अशा उपाययोजना आखण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबईकरांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो. त्याचप्रमाणे वर्षभर मुंबई प्लास्टिक आणि फ्लेक्समुक्त ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे महापौरांनी नमूद केले.
मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी राजकीय भेद बाजूला ठेवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रितू तावडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here