तिर्लोट ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण; ग्रामपंचायती सक्षम करण्यावर भर

0
10

देवगड (प्रतिनिधी) : तिर्लोट (ता. देवगड) येथील ग्रामपंचायत (ग्रामसचिवालय) नव्या इमारतीचे लोकार्पण नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायती सक्षम व सुसज्ज असणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

ग्रामपंचायत हीच लोकविकास आणि ग्रामविकासाची प्रमुख केंद्रे असल्याने गावातील सर्व प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली झाल्यास नागरिकांना सेवा देणे अधिक सुलभ होते. त्यामुळे अशा सुविधा असलेल्या इमारतींमुळे प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करू शकते, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास देवगड तालुका सभापती गणेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, अमोल तेली, रवी पाळेकर, सरपंच सौ. रितिका रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच राजन मधुकर घाडी, मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, बाळ खडपे, गटनेते संजय बोंबडी, भूषण पोकळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here