दापोलीत ६ सप्टेंबरला ‘भव्य रक्तदान शिबिर’; सरोदे समाज युवा संघटनेचा पुढाकार
दापोलीत ६ सप्टेंबरला ‘भव्य रक्तदान शिबिर’; सरोदे समाज युवा संघटनेचा पुढाकार
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
सरोदे समाज युवा संघटना, दापोली (शहर) यांच्या वतीने रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना रक्ताची मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा मानवतावादी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हे रक्तदान शिबिर भागवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. ‘रक्तदान करा, जीवनदान द्या’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“आपल्या एका थेंबातून कोणाचातरी जीव वाचू शकतो… चला, रक्तदान करून मानवतेची सेवा करूया!” असा संदेश देत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष अमित वारकंडे, उपाध्यक्ष संजय कारंडे व प्रशांत धुमाळ, कोषाध्यक्ष रूपेश रसाळ, सचिव स्वप्निल धुमाळ आणि सहसचिव महेश भागवत यांच्यासह प्रकल्प समन्वयक रूपेश रसाळ, डॉ. मंदार क्षीरसागर, डॉ. विनोद घोडेराव, प्रशांत धुमाळ व प्रसाद रसाळ यांचे सहकार्य लाभत आहे.
रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एखाद्याचे जीवन वाचविण्याची अमूल्य संधी आहे. त्यामुळे दापोलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मानवतावादी उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन सरोदे समाज युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
📅 दिनांक : ६ सप्टेंबर २०२६ 📍 स्थळ : भागवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दापोली ⏰ वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
आपली रक्तदानाची एक छोटीशी कृती, कोणासाठी तरी जीवनाची नवी आशा ठरू शकते!