रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांसाठी दापोलीत मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर

0
56
रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांसाठी दापोलीत मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर
रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांसाठी दापोलीत मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर

रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांसाठी दापोलीत मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिर

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली : सामाजिक बांधिलकी जपत श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या वतीने रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांसाठी मोफत फिजिओथेरपी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिनर्जी २०२६’ या उपक्रमांतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रिक्षाचालकांना त्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपामुळे दीर्घकाळ बसणे, वाहन चालविताना होणारा शारीरिक ताण, पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी तसेच स्नायू व सांध्यांशी संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये आरोग्यविषयक व फिजिओथेरपी स्क्रीनिंग, विविध शारीरिक समस्यांचे प्राथमिक निदान व मूल्यांकन, आवश्यकतेनुसार फिजिओथेरपी उपचार, व्यायाम व पुनर्वसनाबाबत मार्गदर्शन तसेच दुखणे आणि शारीरिक तक्रारींबाबत योग्य सल्ला देण्यात येणार आहे.
हे शिबिर ४ सप्टेंबर २०२६ रोजी आर. आर. वैद्य हायस्कूल, दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, इच्छुक रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
‘निरोगी शरीर… आनंदी जीवन! आपले आरोग्य हीच आमची जबाबदारी’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा रिक्षाचालक व सार्वजनिक सेवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोलीच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here