विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध – चित्रलेखा पाटील
नवी दिल्ली l मुंबई प्रतिनिधी
दिल्लीतील युवकांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पाठिंबा जाहीर केला आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकारवर टीका केली.
चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, “देशात ज्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी वागणूक दिली जात आहे, त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळाची आठवण होत आहे. सरकारची ही भूमिका निषेधार्ह आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न होत असला तरी तरुण वर्ग अन्यायाविरोधात मोठ्या संख्येने ठामपणे लढत आहे. या आंदोलनात सहभागी युवक-विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना शेतकरी कामगार पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांच्या प्रश्नांवर सरकारने संवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.