दृष्टिबाधित महिला क्रिकेटपटूंनी रचला इतिहास; जगज्जेत्या भारतीय संघाचा भव्य सत्कार

0
9

मुंबई | प्रतिनिधी
दृष्टिबाधित महिला टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाचा लोकभवन येथे भव्य सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल Jishnu Dev Varma यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar तसेच राज्य मंत्रिमंडळातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांनी यावेळी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करताना, “दृष्टीवर नव्हे तर ध्येयावर लक्ष केंद्रित करत देशाला जगज्जेतेपद मिळवून देणाऱ्या आपल्या वीरांगनांचा अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार काढले.
या ऐतिहासिक सोहळ्यात संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले! इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती Ram Shinde, राजशिष्टाचार मंत्री Jaykumar Rawal, महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू Dr. Ujjwala Chakradeo तसेच भारतीय अंध महिला क्रिकेट संघातील खेळाडू उपस्थित होत्या.
देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या या सर्व खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here