स्थानिक खेळाडूंच्या गरजांनुसार क्रीडा संकुलांचे नियोजन करा – आदिती तटकरे 

0
10
स्थानिक खेळाडूंच्या गरजांनुसार क्रीडा संकुलांचे नियोजन करा - आदिती तटकरे 
स्थानिक खेळाडूंच्या गरजांनुसार क्रीडा संकुलांचे नियोजन करा - आदिती तटकरे 

स्थानिक खेळाडूंच्या गरजांनुसार क्रीडा संकुलांचे नियोजन करा – आदिती तटकरे 

रोहा | प्रतिनिधी
तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा तसेच त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करून नियोजन करण्यात यावे, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
तळा, श्रीवर्धन आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकास, नूतनीकरण आणि विविध सुविधांच्या आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी संबंधित क्रीडा संकुलांसाठी तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मंत्री तटकरे यांनी प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक सुविधा उभारण्याबरोबरच स्थानिक खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here