देवगिरी निवासस्थानी नागरिकांशी थेट संवाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐकल्या समस्या

0
9

मुंबई | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्यांबाबत निवेदने स्वीकारली.

यावेळी नागरिकांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे, शासकीय योजना तसेच विविध प्रशासकीय विषयांशी संबंधित समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
लोकांच्या अडचणींना प्राधान्य देत त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.
देवगिरी निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या समस्या आणि सूचना उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here