नवी मुंबईत मेट्रोला महाराष्ट्र शासनाचा हिरवा कंदील - विमानतळापर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी
नवी मुंबईत मेट्रोला महाराष्ट्र शासनाचा हिरवा कंदील – विमानतळापर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी
नवी मुंबई –
नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. सिडकोच्या मेट्रो विस्तार प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन 1A आणि लाईन 2 विकसित केल्या जातील, ज्यामुळे सागरसंगम पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अखंड मेट्रो कनेक्शन तयार होणार आहे.
पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याला हिरव्या दिव्याची मंजुरी देण्यात आली.CTS-2021 अहवालातील मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमचा हा भाग महत्त्वाचा मानला गेला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या मेट्रो लाईन-१ नंतर सिडकोने पुढील टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला होता; आता मंजुरी मिळाल्याने कामाला सुरुवात शक्य होईल.
सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्या मते हा प्रकल्प शहराला आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक देण्याच्या दिशेने मोठा पाऊल ठरणार आहे.
प्रस्तावित लाईन १A ही बेलापूर सीबीडी ते सागर संगमदरम्यान ३.०२ किमीची उन्नत मार्गिका असेल आणि भविष्यातील गोल्ड लाईनशी जोडली जाणार आहे.
लाईन २ ही पेंधर ते विमानतळ टर्मिनल-४ दरम्यान १४.०७ किमीची असून यात ११ स्थानके असतील. तळोजा येथील अमनदूत स्थानकावरून ही लाइन मेट्रो लाईन-१२ शी जोडली जाईल, ज्यामुळे कल्याण आणि पूर्व उपनगरांना देखील फायदा होईल.
सध्या असलेल्या ११ किमी लाईन-1 सोबत या नव्या मार्गांचे एकत्रिकरण केल्यास सागर संगम ते विमानतळ असा एक सलग २८ किमीचा मेट्रो कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे प्रवाशांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अखंड आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
प्रकल्पाचा खर्च सुमारे ₹5,575 कोटी असून बांधकाम 2027–28 मध्ये सुरू होऊन 2031–32 पर्यंत पूर्ण होण्याचे निश्चिती आहे.
हा विस्तार नवी मुंबईच्या वाहतूक व आर्थिक विकासाला गती देऊन शहराला जागतिक दर्जाचा रूप देईल.