नितेश राणे यांची कणकवली व वैभववाडीतील विविध नवरात्रोत्सवांना भेट

0
8
नितेश राणे यांची कणकवली व वैभववाडीतील विविध नवरात्रोत्सवांना भेट
नितेश राणे यांची कणकवली व वैभववाडीतील विविध नवरात्रोत्सवांना भेट

नितेश राणे यांची कणकवली व वैभववाडीतील विविध नवरात्रोत्सवांना भेट

आदिशक्ती दुर्गामातेचे दर्शन घेत भाविकांना दिल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

कणकवली :
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील कलमठ, फोंडा, खारेपाटण, तरळे आणि कासार्डे तसेच वैभववाडी तालुक्यातील विविध ठिकाणच्या नवरात्रोत्सवांना भेट दिली. यावेळी त्यांनी आदिशक्ती दुर्गामातेचे मनोभावे दर्शन घेतले.

देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी त्यांनी प्रार्थना केली. देवीच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक भाविक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे उत्सवस्थळी भक्तिमय वातावरणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here