पन्हाळ्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पिकांची पाहणी

0
15
पन्हाळ्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पिकांची पाहणी
पन्हाळ्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पिकांची पाहणी

पन्हाळ्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पिकांची पाहणी

पंचनामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश

पन्हाळा :
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पन्हाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध गावांना भेट देत पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ट्रिगर वन लागू करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी मौजे दानेवाडी, जाफळे, केखले, माले, शहापूर आदी ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग यांसह विविध पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.
“शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. नुकसानभरपाई देण्यासाठी पंचनामे जलद गतीने सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केले.
पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पशुधनासाठी चारा उपलब्धतेबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here