पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामांचा आढावा
‘पाणीदार महाराष्ट्रा’ साठी फडणवीस यांचे आवाहन
मुंबई l प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाबाबत सविस्तर सादरी -करण करण्यात आले. या बैठकीत राज्यातील जलसंधारण उपक्रमांचा आढावा घेण्यात येत भविष्या -तील नियोजनावर चर्चा झाली. पाणी फाउंडेशनने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दुष्काळाची तीव्रता कमी करण्यास राज्य शासनाला मोठी मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुढेही फाउंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता लक्षात घेता, राज्यात सुमारे ८० टक्के पावसाचा अंदाज गृहीत धरून जलसंधारण कामांचे नियोजन करावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामस्थ जलसाक्षर होत असून, त्यांच्या कार्याला संबंधित शासकीय यंत्रणांनी आवश्यक सहकार्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जलसंधारणाच्या कामांचा दर्जा राखण्यासाठी नियंत्रण व पडताळणी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद’ अभियानातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मृद व जलसंधारण विभागालाही या उपक्रमात सहभागी करण्याचे निर्देश देण्यात आले


