महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे पहिले अधिकृत कार्यालय झाराप येथे सुरू
कुडाळ l प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप, झिरो पॉईंट येथे महाराष्ट्र नवनिर्माण दूरसंचार सेना चे पहिले अधिकृत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या प्रारंभामुळे संघटनेच्या कार्याला जिल्ह्यात अधिक बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन कार्यालयात सभासद नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली असून स्थानिक कार्यकर्ते तसेच तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संघटनेच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्राशी संबंधित कामगार व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
या कार्यालयाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


