ब्रिटनच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

0
18
ब्रिटनच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन
ब्रिटनच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

ब्रिटनच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

मुंबई l प्रतिनिधी

ब्रिटनमधील बर्मिंगहॅमचे खासदार लियाम बर्न यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीची सविस्तर माहिती देत ब्रिटनमधील गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले.

महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक पॉवर हाऊस असून ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते. गुंतवणुकीसाठी अनुकूल  वातावरण, विकसित पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे राज्य जगभरातील गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी खासदार लियाम बर्न यांनीही महाराष्ट्राच्या प्रगतीचे कौतुक करत, राज्य केवळ भारताचेच नव्हे तर जागतिक गुंतवणूकदारांचे केंद्र बनत असल्याचे गौरवोद्गार काढले. भारत आणि ब्रिटनमधील व्यापारी करार दोन्हींसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याचा देशाच्या सकल घरेलू उत्पादनात सुमारे १३ टक्के वाटा असून देशातील डेटा सेंटर क्षमतेपैकी ६० टक्के क्षमता महाराष्ट्रात आहे. तसेच २०३० पर्यंत एकूण ऊर्जा गरजेपैकी ५२ टक्के ऊर्जा नवीकरणीय स्त्रोतांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’ प्रकल्पासाठी ब्रिटनमधील विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या बैठकीस अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगण, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here