बदलापूर मांजर्ली येथे गॅस शवदाहिनी सुरू

0
34
बदलापूर मांजर्ली येथे गॅस शवदाहिनी सुरू
बदलापूर मांजर्ली येथे गॅस शवदाहिनी सुरू

बदलापूर मांजर्ली येथे गॅस शवदाहिनी सुरू

अंत्यसंस्कार सेवा मोफत

बदलापूर l प्रतिनिधी

बदलापूर मांजर्ली येथे अडीच वर्षांपासून बंद असलेली गॅस शवदाहिनी अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून, नगराध्यक्षा सौ. रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. या शवदाहिनीतून आता नागरिकांना अंत्यसंस्काराची सेवा पूर्णतः मोफत दिली जाणार आहे.

गॅस शवदाहिनी सुरू झाल्यामुळे पारंपरिक लाकडी चितेवरील खर्च, लाकूड टंचाई तसेच पर्यावरणावर होणारा परिणाम टाळता येणार असून, नागरिकांना सन्मान-पूर्वक व सुलभ अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध होणार आहे. दीर्घकाळापासून नागरिकां कडून या शवदाहिनीच्या पुनःप्रारंभाची मागणी होत होती.

नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आवश्यक दुरुस्ती, तांत्रिक तपासणी व मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून ही सुविधा सुरू केली. त्यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here