बारामती पोटनिवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन
बारामती : प्रतिनिधी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काल नागरिकांनी उत्साहात मcदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक मतदारांनी मतदान करून आपली जबाबदारी पार पाडली.
यावेळी “देशाची जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे हे कर्तव्य आहे” असे मत व्यक्त करत, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.