राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश

0
4

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग चे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच रेल्वे पोलीस स्थानकांमध्ये ‘विशेष बाल पोलीस पथक कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य बाल हक्क आयोगाच्या नव्याने स्थापन झालेल्या समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बालकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात संवाद साधता यावा यासाठी हा कक्ष पूर्णपणे बालस्नेही स्वरूपाचा असावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यात हा कक्ष सहज दिसेल अशा ठिकाणी उभारण्यात यावा, तसेच त्यासंदर्भात माहिती देणारे स्वतंत्र फलक लावण्यात यावेत. याठिकाणी प्रशिक्षित व सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून विशेष बाल पोलीस पथक कार्यरत ठेवण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात नियुक्त बाल कल्याण पोलीस अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती संजय पुराणिक यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील बालकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here