मंडणगडमधील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे सोनोग्राफी मशीन सील; जिल्हास्तरीय पथकाची डिकॉय कारवाई

0
42
मंडणगडमधील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे सोनोग्राफी मशीन सील; जिल्हास्तरीय पथकाची डिकॉय कारवाई
मंडणगडमधील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे सोनोग्राफी मशीन सील; जिल्हास्तरीय पथकाची डिकॉय कारवाई

मंडणगडमधील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे सोनोग्राफी मशीन सील; जिल्हास्तरीय पथकाची डिकॉय कारवाई

PCPNDT कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप; तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्याचा प्रशासनाचा दावा

मंडणगड :
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी सेंटरवर जिल्हास्तरीय पथकाने डिकॉय कारवाई केली. या कारवाईदरम्यान PCPNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात अनियमितता आढळल्याचा प्रशासनाचा दावा असून, संबंधित सोनोग्राफी मशीन तातडीने सील करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय पथकाने संबंधित सोनोग्राफी सेंटरमध्ये डिकॉय केस केली. तपासणीदरम्यान केंद्राच्या कामकाजाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाच्या माहितीनुसार, केंद्रात नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर डॉ. सुमन व्यास अनुपस्थित असताना, सोनोग्राफी करण्यासाठी PCPNDT कायद्यानुसार पात्र नसल्याचा प्रशासनाचा दावा असलेल्या डॉ. श्रद्धा आंबेकर (BAMS) या सोनोग्राफी करताना आढळून आल्या.
तसेच, नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असताना त्यांच्या नावाचा शिक्का वापरून सोनोग्राफी अहवालांवर स्वाक्षरी केली जात असल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
सेंटरमधील कागदपत्रांची तपासणी करताना नोंदणीकृत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमन व्यास या पुरुष रुग्णांचीही सोनोग्राफी करत असल्याचे नोंदीतून निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर PCPNDT कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन आणि कथित गैरप्रकार आढळून आल्याने प्रशासनाने संबंधित सोनोग्राफी मशीन सील करण्याची कारवाई केली. या प्रकरणात पुढील प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही संबंधित नियमांनुसार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here